04 March 2021

News Flash

माझ्या जन्माच्या आधीच आई गर्भपात करणार होती, भारती सिंगचा धक्कादायक खुलासा

आपलं बालपण, करिअरमधील संघर्ष आणि यशापर्यंतचा प्रवास याबद्दल तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

भारती सिंग

आपल्या हजरजबाबी आणि अफलातून कॉमेडीने लोकांना पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जेव्हा भारती पोटात होती तेव्हा तिच्या आईने गर्भपाताचा विचार केला होता असं ती म्हणाली. ‘जजबात..संगीन से नमकीन तक’ या शोमध्ये तिने नुकतीच हजेरी लावली होती. आपलं बालपण, करिअरमधील संघर्ष आणि यशापर्यंतचा प्रवास याबद्दल तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. सूत्रसंचालक राजीव खंडेलवालने तिची मुलाखत घेतली.

‘घरची हलाखीची परिस्थिती असल्याने माझ्या आईने मी तिच्या पोटात असताना गर्भपात करण्याचा विचार केला होता. पण तिने ते केलं नाही आणि आज तिला माझा खूप अभिमान आहे,’ असं भारतीने सांगितलं. त्याचवेळी कठीण काळात तिने मला खूप साथ दिली अशी भावनाही तिने व्यक्त केली. एका प्रसंगाविषयी सांगताना ती म्हणाली, ‘माझ्या एका परफॉर्मन्सआधी आईची तब्येत खूप बिघडली होती. तिला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्या परिस्थितीतही तिने मला परफॉर्म करण्याासाठी प्रोत्साहित केलं.’

वाचा : सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट; सुशांतला नेमकं झालंय तरी काय?

भारतीचा हास्यसम्राज्ञी होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादित केलं. तिच्या अफाट विनोद बुद्धीमुळे तिने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही तर आपले एक विशिष्ट स्थानदेखील निर्माण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 12:51 pm

Web Title: my mother wanted to abort me bharti singh makes a shocking revelation
Next Stories
1 आलियासाठी रणबीरची बहिणही ‘राजी’, भावाच्या गर्लफ्रेण्डला दिलं खास गिफ्ट
2 कपड्यांवरुन ट्रोल करणा-यांना करिनाने दिले ‘असे’ प्रत्युत्तर!
3 VIDEO : ‘रणबीर वी लव्ह यू’ म्हणताच सोनमने का दिली अशी प्रतिक्रिया?
Just Now!
X