30 May 2020

News Flash

BREAKING: रितेश-नागराज साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची ‘महागाथा’

अजय-अतुल देणार संगीत; नागराजने पोस्ट केला टीझर

छत्रपती शिवाजी महाराजांची 'महागाथा'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख चित्रपट बनवणार असल्याची चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु होती. आज शिवजयंतीनिमत्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागराजनेच या चित्रपटाच्या घोषणेचा टीझर ट्विट केला आहे.

“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,” असं म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नागराज म्हणतो, “आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)” यामुळे शिवाजी महाराजांचा जीवनपट तीन भागांमध्ये येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागराजने त्याच्या ट्विटमध्ये ‘शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी’ असा उल्लेख करत तीन टप्प्यांमध्ये हा जीवनपट मांडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाची निर्मिती नागराजच्या आटपाट प्रोडक्शन आणि रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२१ साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:03 pm

Web Title: nagraj manjule to direct movie on chartapati shivaji maharaj ritesh and genelia deshmukh will be the producer scsg 91
Next Stories
1 स्वप्नील जोशीच्या लेकीची नेटकऱ्यांना भुरळ; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 ‘बागी 3’मध्ये तब्बल ४०० स्फोटकांचा केला वापर
3 सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; सरसेनापती हंबीरराव येतायत तुमच्या भेटीला
Just Now!
X