News Flash

नाना पाटेकर तेलुगू सिनेसृष्टीत करणार पदार्पण?

चित्रपटाच्या टीमकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

नाना पाटेकर

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ चळवळीची लाटच आली. नानांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले असले तरी त्याचा फटका मात्र त्यांना सहन करावा लागला. अक्षय कुमारने लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातून नानांना डच्चू देण्यात आला. आता नाना तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘नान्ना नेनू’ या चित्रपटात नाना भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास नानांच्या संपर्कात असून लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याचं कळतंय. नाना पाटेकर यामध्ये खलनायकाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

वाचा : सरोज खान यांना इंडस्ट्रीत काम मिळेना; अखेर सलमान धावून आला मदतीला 

दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. नानांचा होकार कळताच चित्रपटाच्या टीमकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. नानांनी याआधी रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 4:18 pm

Web Title: nana patekar to debut in tollywood with allu arjun film
Next Stories
1 ‘बिग बॉस मराठी २’मध्ये केतकी माटेगावकर?; वाचा ती काय म्हणतेय..
2 ..जेव्हा वहीदा रहमान बिग बींच्या कानशिलात लगावतात
3 ‘किंग खान’ची जादू ओसरली?; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब
Just Now!
X