28 September 2020

News Flash

माजी मिस इंडियाला करोनाची लागण; पुण्याहून मुंबईत आल्यावर दिसून आली लक्षणं

पुण्याहून मुंबईला परतल्यानंतर प्रकृती बिघडली अन् करोनाची लक्षणं जाणवली.

दिवसागणिक देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. करोना महामारीच्या विळाख्यात सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि कलाकारही आले आहेत. बॉलिवूडपासून टिव्ही क्षेत्रातील अनेक कलाकारांना करोनाची बाधा झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध मॉडेल, माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नताशा सूर (Natasha Suri) हिचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: नताशानं दिली आहे. नताशा सध्या होम क्वारंटाइन आहे. करोनाची लागण झाल्यामुळे नताशाला आपल्या आगामी डेंडरस या चित्रपटाचे प्रमोशन करता येणार आहे. या चित्रपटात बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोवर यांच्यासोबत नताशा मुख्य भूमिकेत आहे.

बॉम्बे टाइम्सला नताशाने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या आठवड्यात काही कामानिम्मित पण्याला गेली होती. पुण्याहून मुंबईला परतल्यानंतर प्रकृती बिघडली अन् करोनाची लक्षणं जाणवली. ताप, गळ्यात खरखर आणि अशक्तपणा जाणवल्यानंतर नताशानं तीन दिवसांपूर्वी करोनाची चाचणी केली. या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे.

‘सध्या प्रकृतीत सुधारणा आहे. ताप आणि आशक्तपणा जावणत आहे. पण वेळेवर गोळ्या आणि इम्युनिटी बूस्टर घेत आहे. सध्या आजी आणि बहिणीसोबत राहत आहे. त्यामुळे त्यांचीही करोना चाचणी करणार असल्याचे नताशानं सांगितलं. ‘  करोनाची लागण झाल्यामुळे नताशा डेंजरस या चित्रपटाचे प्रमोशन करु शकत नाही. या चित्रपटाचे १० ऑगस्ट पासून प्रमोशन सुरु होणार आहेय या चित्रपटात बिपाशा आणि करणसिंह ग्रोवरही दिसणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन करु न शकत नसल्यामुळे दुखी असल्याचं नताशानं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 11:11 am

Web Title: natasha suri tests positive for covid 19 nck 90
Next Stories
1 बिग बॉस १४चा प्रोमो प्रदर्शित, शोला मिळावे नवे टायटल
2 ‘सुशांतच्या रुममधील फॅनही वाकलेला नव्हता, कडीही तुटलेली होती’; फॉरेन्सिक तज्ज्ञाचा खुलासा
3 ‘करण जोहरची नवी खास मैत्री असल्यामुळे तिला..’,सुचित्रा कृष्णमूर्तिचा नेहा धूपियावर निशाणा
Just Now!
X