27 November 2020

News Flash

‘इंडस्ट्रीमध्ये रियासारखे अनेक लोक ब्लॅकमेल करून…’; नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावाचं ट्विट

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.

शमस सिद्दिकी, रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा भाऊ शमस याने ट्विट करत रियावर टीका केली आहे.

‘इंडस्ट्रीमध्ये रिया चक्रवर्तीसारखे अनेक लोक आहेत, जे ब्लॅकमेल करून लोकांच्या मेहनतीवर पाणी फेरतात आणि सर्वकाही बळकावू इच्छितात. मग हे ब्लॅकमेल वैयक्तिक पातळीवर असो किंवा माध्यमे आणि ट्विटरच्या आधारे..’, असं ट्विट शमसने केलं आहे.

आणखी वाचा : प्रसाद ओकच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के; सोशल मीडियावर लिहिली पोस्ट

नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दिकी हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचसोबत तिने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले होते. याउलट शमसने आलियाविरोधात तक्रार दाखल केली. शमसने रियाचा उल्लेख करत आलियावर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”, असे आरोप त्यांनी केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:23 pm

Web Title: nawazuddin siddiqui brother shamas pens a cryptic message on rhea chakraborty ssv 92
Next Stories
1 विवेक ओबेरॉयच्या चित्रपटातून ही स्टारकिड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 Video: कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदचे अश्रू अनावर, पाहा नेमकं काय झालं
3 ‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड’मध्ये ‘एक होतं पाणी’ला सात नामांकने
Just Now!
X