25 September 2020

News Flash

एकेकाळी कामाच्या शोधात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने लॉकडाउनमध्ये साइन केले तीन चित्रपट

या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीने कामाच्या शोधात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती.

कलाविश्वात अनेकदा दमदार कलाकार असूनही कामाची वाट पाहावी लागते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कामाच्या शोधात असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांना ‘बधाई हो’ सारखा दमदार चित्रपटसुद्धा मिळाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स येऊ लागले. सध्या लॉकडाउनमध्ये त्यांनी तीन चित्रपट साइन केले आहेत.

लॉकडाउनदरम्यान सहा स्क्रीप्ट वाचल्या असून त्यातल्या तीन आवडल्याचं नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. त्या तीनपैकी एक चित्रपट दिग्दर्शक शाद अली यांचा आहे. जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल तेव्हा मुंबईला परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नीना गुप्ता सध्या त्यांच्या मुक्तेश्वर इथल्या घरी आहेत.

View this post on Instagram

Today evening sky from my house

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

आणखी वाचा : …म्हणून शाहरुखने नाकारली होती ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर 

नीना गुप्ता या हितेश कैवल्यच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात झळकल्या होत्या. यामध्ये आयुषमान खुराना, जितेंद्र कुमार आणि गजराज राव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 10:27 am

Web Title: neena gupta reveals she signed three projects amid the lockdown ssv 92
Next Stories
1 …म्हणून शाहरुखने नाकारली होती ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर
2 विठ्ठल भक्तीत दंग करायला लावणारी १५ भक्तिगीते
3 मुंबई पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवचा सेल्फी, म्हणाला तुम्हाला मानाचा सलाम !
Just Now!
X