News Flash

“माझं एक स्वप्न पूर्ण झालं”- नीना गुप्ता; जाणून घ्या त्या स्वप्नाबद्दल!

एकता कपूरच्या 'गुडबाय' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अभिनेत्री नीना गुप्ता आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट मिळणं ही त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती असल्याचंही नीना यांनी सांगितलं. काय आहे कारण? जाणून घेऊया.

विकास बहल यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘गुडबाय’ या नव्या चित्रपटातून नीना गुप्ता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे यात त्या बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट एका शोकसभेच्या संदर्भातला असून यात लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री रश्मिका मंदानाही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या चित्रपटाच्या माध्यमातून नीना आणि अमिताभ हे प्रथमच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट स्वीकारण्यामागचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की, विकासने जेव्हा त्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवली तेव्हा त्यांना ती फारच आवडली. त्या हेही म्हणाल्या की, अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी त्या खूपच उत्सुक आहेत. त्या म्हणाल्या, “ही स्क्रिप्ट फारच चांगली आहे. आणि जेव्हा स्क्रिप्ट एवढी चांगली असते तेव्हा आपण दुसरा कोणता विचार करु शकत नाही. माझी भूमिका उत्तमरित्या लिहिलेली आहे आणि मी मिस्टर बच्चन यांच्यासोबत काम करण्यास फार उत्सुक आहे. हे माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.”

२०१८ साली अमिताभ बच्चन यांनी नीना गुप्ता यांना एक स्वलिखित पत्र पाठवलं होतं, ज्यात अमिताभ यांनी नीना यांच्या ‘बधाई हो’ या चित्रपटातल्या कामाची प्रशंसा केली होती. ‘गुडबाय’ हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांची निर्मिती आहे.

मुंबईत १ एप्रिल रोजी या चित्रपटाचा मुहुर्त पार पडला. रश्मिकाने त्याच दिवशी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली तर अमिताभ यांनी ४ तारखेला चित्रीकरणाला सुरुवात केली. चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल आणि निर्माती एकता कपूर यांनी पूर्वी ‘लुटेरा’ तसंच ‘उडता पंजाब’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 8:04 pm

Web Title: neena gupta said it is my dream to work with mr bachchan vsk 98
Next Stories
1 वरुण आणि नताशाने दिला एक लाखांचा मदतनिधी
2 जनता विरुद्ध इंदिरा गांधी; एकता कपूरची नवी घोषणा
3 नेटफ्लिक्सलाही करोनाचा फटका! प्रदर्शनासाठी नव्या सीरिजचा तुटवडा?
Just Now!
X