काही दिवसांपूर्वी बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ट्रोलिंगला कंटाळून नवे प्रायव्हेट अकाऊंट बनवले होते. तसेच हे अकाऊंट मोठेमोठे कलाकार फॉलो करत होते. त्यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खानचा समावेश होता. तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन, अनन्या पांडे आणि इतक कलाकार ते फॉलो करताना दिसत होते. मात्र आता हे अकाऊंट डिअ‍ॅक्टीवेट झाले असल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान, सोनम कपूर, अनन्या पांडे, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही कलाकारांनी ट्रोलिंगला कंटाळून कमेंट बॉक्स प्रायव्हेट केले तर काहींनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. अशातच नेटकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर असलेल्या करणने मात्र नवे प्रायव्हेट अकाऊंट बनवले असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा : नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिसला करण जोहर, झाला पुन्हा ट्रोल

‘karanafffairs’ या नावाने हे अकाऊंट होते. हे अकाऊंट मात्र वेरिफाइड नव्हते. आता ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार करण जोहरने हे अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट केले आहे.

आणखी वाचा : करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण

सुशांतच्या निधनानंतर करण जोहरने एक पोस्ट लिहिली होती. ‘दोष माझाच आहे मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात नव्हतो… मला कधीकधी असे वाटायचे की त्याला आयुष्यातील गोष्टी शेअर करण्यासाठी कोणी तरी हवे आहे… परंतू तरीही मी त्या भावनांचा पाठपुरावा कधीच केला नाही. मी अशी चूक पुन्हा करणार नाही’ असे करणने पोस्ट मध्ये म्हटले होते. त्यानंतर करणने सुशांत खपू काही शिवकून गेला असे म्हटले होते. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

एका मुलाखतीत करणच्या मित्राने त्याच्यावर ट्रोलिंगचा परिणाम झाला असल्याचे सांगितले होते. “सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे हादरला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्वांचा त्याच्यावर खूप परिणाम होत आहे. करणला जेव्हा कधी मी फोन करतो, तेव्हा तो रडतो. यात माझी काय चूक आहे, असा प्रश्न तो विचारतो”, असे करणच्या मित्राने सांगितले होते.