स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर भेटीला येणार असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेचीं निर्मिती केली असून या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुहूर्ताच्या या खास प्रसंगी कलाकारांसोबतच सेटवर महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते. देवीचा आशीर्वाद घेऊन आणि सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New serial on star pravah sukh mhanje nakki kay asta ssv
First published on: 20-07-2020 at 18:23 IST