News Flash

बॉक्स ऑफिसवर ‘घनचक्कर’ने घेतली चक्कर

गेल्यावर्षी बॉक्स ऑफीसवर पाठोपाठ दोन हिट चित्रपट देणा-या विद्या बालनची हॅट्रिक चुकली आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला 'घनचक्कर' या विनोदी चित्रपटाने चक्कर खाल्ली असून बॉक्स

| July 2, 2013 12:24 pm

गेल्यावर्षी बॉक्स ऑफीसवर पाठोपाठ दोन हिट चित्रपट देणा-या विद्या बालनची हॅट्रिक चुकली आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘घनचक्कर’ या विनोदी चित्रपटाने चक्कर खाल्ली असून बॉक्स ऑफीसवर कमाल करण्यास  चित्रपटास अपयश आले.
‘नो वन किल जेसिका’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्या आणि इमरान प्रेक्षकांवर जादू चालविण्यास असफल राहिले आहेत. चित्रपटाने सुरुवातींच्या दिवसांमध्ये केवळ २० कोटींचा गल्ला जमावला आहे. समीक्षकांचे घनचक्करबाबत खास मत नसून चित्रपट अधिक मजेशीर होऊ शकला असता असे त्यांचे म्हणणे आहे.
‘घनचक्कर’ला सध्या धनुष आणि सोनम कपूर यांचा ‘रांझना’ चित्रपट चांगलेच आव्हान देत आहे. या चित्रपटाने दुस-या आठवड्यात १०.७० कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 12:24 pm

Web Title: no hattrick for vidya balan ghanchakkar fails at box office
Next Stories
1 केवळ आवड म्हणून अभिनयः किरण राव
2 लारा दत्तासाठी शशांक घोष चित्रपटाचे दिग्दर्शन करणार?
3 ‘गुलाब गॅंग’ चित्रपटाचा ट्रेलर आयफामध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता
Just Now!
X