News Flash

‘ओ साकी साकी’च्या रिक्रिएट व्हर्जनवर नोराचा बेली डान्स पाहिलात का?

गाण्यातील नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत

नोरा फतेही

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. आता नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणे जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील आहे.

‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. नोरा गाण्यामध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. तिचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

१९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

यामध्ये जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते त्यांची भूमिका जॉन साकारणार आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री असे नेमकं काय घडलं होतं याची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 4:33 pm

Web Title: nora fatehi o saki saki son released avb 95
Next Stories
1 Video : ‘वर्ल्ड कप’ खेळायला गेला होतात की हनिमूनला? विराट व रोहितला राखी सावंतचा सवाल
2 या कारणासाठी अक्षय कुमारच्या मुलाला आवडत नाही क्रिकेट
3 ‘अर्जुन रेड्डी’ म्हणतोय ‘मी का बघू कबीर सिंग?’
Just Now!
X