News Flash

‘नो रिस्क, नो स्टोरी..’, प्रेग्नेंट नुसरत जहां यांनी शेअर केलं स्विमिंगपूलमधलं फोटो शूट

नुसरत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रेग्नेंट असताना नुसरत केलं स्विमिंगपूलमध्ये फोटो शूट.

टीएमसीच्या खासदार आणि बंगाल चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहां या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्न, अफेअर आणि प्रेग्नेंसी या कारणांमुळे त्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांनी नुकतेच एक फोटो शूट केले आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे.

नुसरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसतं आहे. नुसरत स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहेत. त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “कोणती ही जोखीम नसेल तर कहाणी नसेल”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे. गर्भवती असून त्यांनी स्विमिंग पूलमध्ये केलेल्या या फोटोशूटमुळे अनेकांनी त्यांची स्तुती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ १ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

नुसरत या गर्भवती असून त्यांचा पती निखिलने सांगितले की ते त्यांचे बाळ नाही. एवढंच नाही तर ते दोघे बऱ्याच दिवसांपासून एकत्र राहत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नुसरत सध्या बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

आणखी वाचा : नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

१९ जून रोजी नुसरत आणि निखिल यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाले. मात्र, हे दोघे या वर्षी एकत्र नव्हते. १९ जून २०१९ रोजी या दोघांनी तुर्कीच्या बोड्रम सिटी येथे लग्न गाठ बांधली. दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन प्रथेनुसार पार पडले होते. कोलकाता येथील आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये नुसरत आणि निखिल यांनी आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. या सोहळ्यात राजकारण आणि चित्रपट जगातातील, इतर क्षेत्रातील बऱ्याच लोकांनी हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 7:45 pm

Web Title: nusrat jahan did a photoshoot in swimming pool shared video went viral dcp 98
Next Stories
1 Video: ‘समांतर २’मध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? स्वप्नील जोशी म्हणतो…
2 ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापेस्टला पोहोचला अर्जुन रामपाल; मुलगा आणि गर्लफ्रेंडसोबत करतोय मजा
3 ‘लक्ष्मी घर आयी’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X