News Flash

‘ओके जानू’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येत आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘ओके जानू’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि करण जोहरने त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. हे पोस्टर सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे.

अतिशय लक्षवेधी असणाऱ्या या पोस्टरच्या पार्श्वभागामध्ये मुंबईचे धुसर चित्रही दिसत आहे. या पोस्टरवर लिहिलेले ‘फिगर आऊट करलेंगे’ आणि या चित्रपटाने नाव जोडले असता ‘ओके जानू…फिगर आऊट करलेंगे’ असेच काहीसे वाक्यही तयार होत आहे. त्यामुळे आदित्य आणि श्रद्धा या चित्रपटातून नक्की काय फिगर आऊट करणार आहेत हे काही अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. पण प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी हे पोस्टर यशस्वी होताना दिसत आहे. १३ जानेवारी २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या पोस्टरवरील आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा फोटो अनेकांचेच लक्ष वेधत असतानाच पोस्टरवरील मणि रत्नम, करण जोहर, गुलजार, ए. आर. रेहमान आणि शाद अली ही नावेसुद्धा या पोस्टरला चर्चेत आणत आहेत. निर्माता म्हणून मणि रत्नम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहेत असेच म्हणावे लागेल. एश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या रावन या चित्रपटानंतर ते थेट ‘ओके जानू’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘ओके जानू’ हा चित्रपट ‘ओके कन्मनी’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे असे म्हटले जात आहे. आजच्या तरुणाईची मानसिकता हाताळत एका सुरेख प्रेमकथेचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘ओके जानू’ या चित्रपटातून अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येत आहे.

दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर लवकरच एक चित्रपट काढण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. दरम्यान, दाऊदच्या परिवाराने अचानक जाऊन श्रद्धाची भेट घेतली. हसीनाची तिन्ही मुले चित्रपटातील कलाकारांना भेटण्यासाठी गेली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:36 pm

Web Title: ok jaanu first look aditya roy kapoor shraddha kapoor light up ok kanmani remake see pic
Next Stories
1 Video: ‘बेवॉच’च्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचे ओझरते दर्शन
2 ‘दंगल’पूर्वी घाबरलाय आमिर
3 VIDEO: ‘स्पायडर मॅन होमकमिंग’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X