News Flash

‘माझ्या नवऱ्याची बायको’ने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीची पोस्ट चर्चेत

७ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या मालिकेने काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला आहे. काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता. याच निमित्ताने मालिकेतील गुरूनाथ (गॅरी) म्हणजेच अभिजीत खांडेकर याची खरी पत्नी सुखदा खांडेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सुखदाने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुखदाने अभिजीतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा शेवटचा भाग हा आज प्रसारित होणार आहे. अभि…साडे चार वर्ष आणि १३७५ पेक्षा जास्त भाग…मला तुझा अभिमान आहे. तुझं कामाप्रति समर्पण, प्रक्रियेवरील तुझा विश्वास आणि सातत्य हे अकल्पनीय आहे. आम्हाला हा प्रेमळ गुरूनाथ / गॅरी दिल्याबद्दल धन्यवाद .. ही भूमिका तुझ्या शिवाय कोणीच एवढ्या चांगल्या प्रकारे फूलवू शकलं नसतं. त्याची नेहमीच आठवणं येईल.” अशा आशयाचे कॅप्शन सुखदाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

या मालिकेचा पहिला भाग हा २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हा पासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुरूवातीच्या काळात ही मालिका टीआरपीमध्ये ही नंबर एकला होती. या मालिकेला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांमध्ये मालिकेने तिचा ट्रॅक बदलला म्हणून प्रेक्षक नाराज झाले होते. त्यांमुळेच निर्मात्यांनी ही मालिका संपवण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 10:56 am

Web Title: on the end of the mazhya navryachi bayko abhijeet s wife sukhada khandekar wrote a post dcp 98
टॅग : Marathi Drama
Next Stories
1 नवरा माझा गुणाचा!, पत्नी मीराकडून शाहिदला शाब्बासकी
2 रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज
3 कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या स्वयंपाक घरातून माकडाने केली चोरी, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X