2017 सालामध्ये रिलीज झालेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत झळकला होता. सिनेमा चालला नसला तरी चित्रांगदाने केलेल्या एका खळबळजनक खुलास्यामुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता.

२०१८ सालात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेत अनेक अभिनेत्रींनी देखील लैंगिक शोषणाचे धक्कादायक खुलासे केले होते. यावेळी चित्रांगदाने देखील ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाच्या सेटवरील एक खळबळजनक अनुभव शेअर केला होता. या सिनेमाच्या शूटिंगवेळी एका बोल्ड सीनमुळे चित्रांगदा अस्वस्थ झाली होती

आईबी टाइम्सच्या वृत्तानुसार चित्रांगदा म्हणाली होती, “जेव्हा मी सिनेमाचं शूटिंग करत होते तेव्हा मला अचानक नवाजुद्दीनसोबत इंटिमेट सीन करण्यास सांगण्यात आलं होतं. दिग्दर्शक माझ्याजवळ आले आणि म्हणाले “तुझा परकर वर कर आणि …यावेळी मला नेमकं काय चाललंय हे लक्षातच आलं नाही. मग मला नवाजच्यावर बसायला सांगण्यात आलं.त्यानंतर यांना माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे माझ्या लक्षात आलं ”

हे देखील वाचा: “कपडे बदलत असताना ते माझ्या खोलीत आले आणि माझ्या…”; हनी सिंगच्या पत्नीचे सासऱ्यांवर खळबळजनक आरोप

हे देखील वाचा: “जखमा दिसू नयेत म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते”; अभिनेत्रीने पतीवर केले हिंसाचाराचे आरोप

चित्रांगदा पुढे म्हणाली, “यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र त्यांनी मला मी जसं सांगेन तसं कर कारण मी दिग्दर्शक आहे असं बजावलं. असं कोण बोलतं? ते एक प्रकारचं शोषण होतं. मी नाराज होवून बाहेर निघून गेले.” यावेळी त्या ठिकाणी नवाजुद्दीन एक महिला निर्माती आणि इतर काही महत्वाच्या व्यक्ती होत्या मात्र यापैकी कुणीही आपल्या बाजूने उभं न राहिल्याचं चित्रांगदा म्हणाली.

दरम्यान या सिनेमात चित्रांगदा सिंहने या सिनेमात काम करण्यास नकार दिला. सिनेमाच्या पहिल्या प्रमोशन वेळी ‘चित्रांगदाने हा सिनेमा सोडल्याचा आम्हाला आनंद आहे. तिच्या जागी आम्हाला चांगली अभिनेत्री मिळाली’ असं थेट जाहीर करण्यात आलं होतं. तर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाचे दिग्दर्शक कुशान नंदी यांचे बिझनेस पार्टनर असलेले किरण श्रॉफ यांनी चित्रांगदाने केलेले आरोप खोटे असल्याचं म्हंटलं होतं. चित्रांगदाने सिनेमाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल अपेक्षित असल्यास सांगितलं होतं. हे बदल न केल्याने तिने सिनेमात काम करण्यास नकार दिल्याचं श्रॉफ म्हणाले.