News Flash

Oscar 2021 : म्हणून ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावं ठेवतात गोपनीय

'ऑस्कर' विजेत्यांच नाव गोपनीय का ठेवलं जातं?

आपण आजवर मनोरंजन क्षेत्र, काही क्रीडा क्षेत्रातील, काही साहित्य, तर काही विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सोहळे पाहिले आहेत. या सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन असते. ती म्हणजे एखादी व्यक्ती व्यासपीठावर येऊन सीलबंद पाकीट फोडते आणि पुरस्कारचा मानकरी घोषीत करते. विजेत्यांची नावे सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात. पण ही सुरुवात कोणी केली असेल? असा प्रश्न अनेकांना नक्की पडला असेल. पुरस्कार सोहळ्यांमधील विजेत्यांचं नाव सिलबंद पाकिटात गुप्त ठेवण्याचा जो प्रकार आहे ना, त्याची सुरुवात केली ती ऑस्करनेच.

आणखी वाचा : Oscar 2021, बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा

ऑस्कर विजेत्याचं नाव गुप्त का ठेवतो?

१९२९ साली पहिला ऑस्कर सोहळा साजरा केला गेला. त्यावेळी सर्व विजेत्यांची नावं तीन महिने आधिच जाहीर करण्यात आली होती. विजेत्यांची नावं आधीच माहिती पडल्यामुळे पहिल्या ऑस्करबाबत कुणीच उत्साही नव्हतं. यावर त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक सेड्रिक गिब्ज यांनी एक उपाय सुचवला. थेट विजेत्यांचं नाव जाहिर करण्यापेक्षा पाच संभाव्य विजेत्यांची नावं जाहिर करायची. या प्रकाराला आज पण नामांकन असं म्हणतो. या पाचही नामांकित स्पर्धकांची जोरदार जाहिरात करायची आणि पुरस्कार दिनादिवशी विजेत्याचं नाव जाहिर करायचं. अशी कल्पना त्यांनी मांडली. ही कल्पना ऑस्कर समितीतील सर्व सभासदांना आवडली. त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची. यामुळे पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी त्यांची जाहिरातही होत असे आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये पुरस्काराबाबत उत्साह देखील राहात असे.

परंतु १९४१ साली यात थोडासा बदल करण्यात आला. ऑस्कर समितीने आदल्या दिवशी वृत्तमाध्यमांना विजेत्यांची नावं देणं थांबवलं. त्यांनी सिलबंद पाकिटात नावं गुप्त ठेवण्याचा प्रयोग केला. आणि हे पाकिट व्यासपीठावरच फोडले जाईल याची काळजी घेतली. हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि वृत्तमाध्यमं देखील चकित झाली. ऑस्करबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला. तेव्हापासून आजतागात ऑस्कर विजेत्यांची नावं सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 10:22 am

Web Title: oscar 2021 why oscar winners names kept as a secret avb 95
Next Stories
1 ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’चा बोलबाला, तीन पुरस्कारांवर कोरलं नाव
2 Oscar 2021: बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा
3 कोण आहे ओमची खऱ्या आयुष्यातील स्वीटू?; ‘अशी ‘आहे शाल्व किंजवडेकरची लव्ह स्टोरी
Just Now!
X