फुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे. सध्या परिणीती बॅडमिंटनचे धडे घेत असून बॅडमिंटन कोर्टावर अनेक तास घाम गाळत आहे. मात्र नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून बॅडमिंटनची प्रॅक्टीस करत असताना मानेला दुखापत झाल्याचं सांगितलं.

“मी, सायना आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सेटवर कोणतीही दुखापत होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत असतो. मात्र तरीदेखील हे झालंच. पुन्हा बॅडमिंटनची प्रॅक्टीस करण्यापूर्वी मला थोडी विश्रांती घ्यावी लागेल”,अशी पोस्ट परिणीतीने इन्स्टावर केली. सोबत एक फोटोही शेअर केला.

 

View this post on Instagram

 

30 more days to be her … and live her!! #SainaNehwalBiopic @nehwalsaina

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करत असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार होती. यासाठी तिने बॅडमिंटनचा सराव करण्यास सुरुवातदेखील केली होती. मात्र श्रद्धाने अन्य काही चित्रपटांसाठी सुद्धा तारखा दिल्या होत्या. त्यामुळेच तिच्या व्यस्त कामकाजामुळे तिला हा बायोपिक सोडावा लागला.