News Flash

१ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायलची माघार; ‘या’ अभिनेत्रीची माफी मागण्यास तयार

अब्रुनुकसान प्रकरणात पायल घोषची माघार

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. पायलने एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. परिणामी संतापलेल्या रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली आहे. रिचाची बिनशर्त माफी मागायला ती तयार आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टात सुनावणीदरम्यान पायलने माघार घेतली. ती म्हणाली, “मी रिचाची बिनशर्त माफी मागायला तयार आहे. कुठल्याही हेतूपरस्पर तिचं नाव मी घेतलं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. मी तिची खूप मोठी फॅन आहे. मी बोलताना थोडं भान ठेवायला हवं होतं. मी माझं विधान मागे घेत आहे. कुठल्याही महिलेला बदनाम करणं हा माझा उद्देश नव्हता.”

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. खान यालाही प्रतिवादी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 11:43 am

Web Title: payal ghosh ready to apologise richa chadha bombay hc mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाची करोनावर मात
2 अक्सा बीचवर पुन्हा त्यांची भेट झाली अन्…; शाहरुख-गौरीची हटके लव्हस्टोरी
3 शाहरूखने सांगितली DDLJ मधील अमरिश पुरींसोबतच्या ‘त्या’ दृश्यामागील खरी गंमत
Just Now!
X