चित्रपट हे माध्यम अनेक कलाकार वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. काही सामाजिक तर काही विनोदी, काही थरारक तर काही प्रेमकथा सांगणारे.पण अश्यावेळी जेव्हा एक प्रेमकथा जुळ्या बहिणींची असेल तर त्यात किती गंमंत येईल. अशीच एक अगदी यूथफुल कथा जी प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन जाईल तुमच्या भेटीला नेहा राजपाल प्रोडक्शनच घेऊन येत आहे. चित्रपटाचं शिर्षक काय असेल ह्याची उत्सुकता लोकांमघे शूटींच्या पहिल्या दिवसापासून होती आणि फायनली “फोटोकाॅपी” शिर्षक एका फर्स्ट लूक पोस्टरद्वारे जाहिर झाला.
व्हॉट्सअॅप टॅलेंट हंटच्या माध्यमातून घेतलेल्या ऑडीशन्समधून मराठी चित्रपटसृष्टीला नवा हीरो मिळाला आहे. चेतन चिटणीस या नवोदित कलाकाराला सिनेमात पाहता येणार आहे. ९ x झकास आणि रेडियो सिटी यांनी एकत्रित घेतलेल्या टॅलेंट हंट कॉम्पिटीशनमधील २० हजार स्पर्धकांमधून त्याची निवड करण्यात आली आहे. तर डबलरोल मध्ये दिसणार आहे नाट्य सृष्टीतलं आजच्या पिढीतलं आघाडीचं नाव पर्ण पेठे. त्यामुळे हटके अशी फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिनेमातील जुळ्या बहिणींच्या गोड आजीची भूमिका वंदना गुप्ते यांनी केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन विजय मौरया यांनी केलं असून कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांची आहे. सिनेमाचे चित्रीकरण पुणे आणि लावासा येथील अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी करण्यात आलं आहे. हा सिनेमा २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.