News Flash

हायकोर्टानं कामसूत्राचा दाखला देत स्तनपानाच्या फोटोविरोधातील याचिका फेटाळली

‘मातांनो केरळवासीयांना सांगा, कृपया रोखून पाहून नका आम्हाला स्तनपान करू द्या’ अशा ओळींसह ‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील फोटोने सर्वांचच लक्ष वेधलं होतं.

गृहलक्ष्मी, grihalakshmi

मल्याळम मासिक ‘गृहलक्ष्मी’च्या मुखपृष्ठावर एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला होता. ज्यानंतर या मासिकावर अनेकांनीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना न्यायालयात या मासिकाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली. पण, आता मात्र केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

‘गृहलक्ष्मी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर गिलू जोसेफ ही मॉडेल झळकली होती. ज्यात काहीच गैर नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती. तिच्या या मताशी आता न्यायालयही सहमत असल्याचं स्पष्ट झालं आहे.  ‘मातांनो केरळवासीयांना सांगा, कृपया रोखून पाहून नका आम्हाला स्तनपान करू द्या’ अशा ओळींसह ‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील फोटोने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावरही या विषयाला बरीच चालना मिळाली होती.

मार्च महिन्याच्या आवृत्तीसाठीच्या मुखपृष्ठावरील या फोटोच्या विरोधात वकील विनोद मॅथ्यू विल्सन यांनी तो फोटो अश्लील आणि अशोभनीय असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय त्या मासिकासोबतच त्यावर झळकणाऱ्या मॉडेलविरोधातही भारतीय दंडसंविधानात येणाऱ्या पोस्को, कलम ४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

मासिकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अँटोनी डॉमिनीक आणि दामा शेषाद्री नायडू यांनी त्यांच्या निरीक्षणातून स्पष्ट केलं होतं की, भारतीय कलेमध्ये नेहमीच मानवी शरीराचं चित्रण करण्यात आलं आहे. आपल्याकडे त्याविषयीची उदाहरणंही आहेत, ज्यामध्ये कामसूत्र, राजा रवी वर्माची चित्र आणि अजिंठा लेण्यांमधील मूर्तीकलेची उदाहरणं पाहण्याजोगी आहेत. त्यामुळे त्या मासिकाच्या मुखपृष्ठावरुन झळकलेली कोणतीच गोष्ट ही अश्लीलतेकडे झुकणारी नव्हती, असंही स्पष्ट करण्यात आलं. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘गृहलक्ष्मी’ मासिकाकडून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 5:17 pm

Web Title: plea against grihalakshmi magazines breastfeeding cover junked kerala hc cites kamasutra and ajanta paintings
Next Stories
1 हिंदू – मुस्लीम जोडप्याची तक्रार : त्या पासपोर्ट अधिकाऱ्यानं आरोप फेटाळले
2 कुख्यात वीरपन्नचा खात्मा करणाऱ्या अधिकाऱ्याची जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती
3 काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान एकाकी, भारताची बाजू भक्कम
Just Now!
X