27 February 2021

News Flash

कठुआ बलात्कार प्रकरणातील बिग बींच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर चिडली पूजा भट्ट

गेल्या आठवड्यात चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिताभ बच्चन यांना कठुआ बलात्कार प्रकरणी प्रश्न विचारला होता. या प्रतिक्रियेनंतर अभिनेत्री- निर्माती पूजा भट्ट हिनं बिग बींवर टीकेची तोफ

बिग बींवर अभिनेत्री- निर्माती पूजा भट्ट हिनं टीकेची तोफ डागली आहे.

कठुआ बलात्कार प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार? हे सगळे प्रकरण अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारं आहे अशी प्रतिक्रिया देणाऱ्या बिग बींवर अभिनेत्री- निर्माती पूजा भट्ट हिनं टीकेची तोफ डागली आहे. तुम्ही ज्या भूमिका चित्रपटाद्वारे मांडता त्या कधीतरी प्रत्यक्षातही उतरवा असा टोला तिनं अमिताभ बच्चन यांना लगावला आहे. पण ट्विटवर अभिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेवर राग व्यक्त करणाऱ्या पूजाला मात्र नेटीझन्सनं ट्रोल केलं आहे. ती केवळ प्रसिद्धीसाठी बच्चन यांच्यावर टीका करत आहे अशा शब्दात तिच्यावर नेटीझन्सनं राग व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यात चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिताभ बच्चन यांना कठुआ बलात्कार प्रकरणी प्रश्न विचारला होता. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासही आपल्याला दहशत वाटते असे हताश उद्गार अमिताभ बच्चन यांनी काढले होते. कठुआ बलात्कार प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार? हे सगळे प्रकरण अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मला या प्रकरणाबद्दल बोलण्याचीही दहशत वाटते इतके हे प्रकरण लांछनास्पद आहे अशी प्रतिक्रिया बच्चन यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर पूजानं अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विटरद्वारे अपरोधिक टीका केली आहे. ‘मला आता पिंक हा एकच चित्रपट आठवत आहे. तुमची जी पडद्यावर प्रतिमा आहे तिच खऱ्या आयुष्यातही दाखवा’ असा टोला तिनं लगावला आहे.

‘पिंक’ या चित्रपटात अमिताभ बच्चन हे कसे तीन मुलींच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. त्यांना न्याय मिळवून देतात याची आठवण पूजानं यावेळी करून दिली. पण, तिने केलेली टीका ही केवळ प्रसिद्धीसाठी आहे. तिनं मद्यपान करून ट्विट केलंय अशा शब्दात ट्विटवर पूजाला ट्रोल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 1:29 pm

Web Title: pooja bhatt reminded amitabh bachchan of his film pink after the stars non comment on kathua and unnao rape case
Next Stories
1 महेश मांजरेकर यांची लेक सलमानच्या ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
2 Bigg Boss Marathi: पहिली विकेट आरती सोलंकीची!
3 महेश बाबूचा हा चित्रपट ठरतोय सुपरहिट; दोन दिवसांत जमवला १०० कोटींचा गल्ला
Just Now!
X