03 March 2021

News Flash

Boyz 2 Poster : अतरंगी ‘बॉईज’ परतले

'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर 'बॉईज' सिनेमातील अतरंगी पोरं दिसतील.

किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर आता महाविद्यालयीन जगात पाऊल टाकलेले बॉईज आपल्याला पहायला मिळणार आहेत. आता हे बॉईज नेमकी कोणती धम्माल घेऊन येतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची मजामस्ती यानिमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आगामी ‘बॉईज २’ मध्ये ही अतरंगी मुले आपल्याला पुन्हा एकदा दर्शन देणार आहेत. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रॉडक्शन सुप्रीम मोशन पिक्चर्सअंतर्गत करण्यात आले आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असल्याने चित्रपटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर ‘बॉईज’ सिनेमातील अतरंगी पोरं दिसतील. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे त्यांच्या हास्यातून कळून येते. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमातून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा धमाका घेऊन येत आहेत. येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी ‘बॉईज २’ च्या निर्नितीची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट भारताबरोबरच भारताबाहेरही दाखविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 7:40 pm

Web Title: poster of boyz 2 movie release
Next Stories
1 अनुष्कानंतर आता राधिका आपटे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
2 Top 10 News : मिलिंदच्या ‘त्या’ वक्तव्यापासून सलमानच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
3 संजयने सांगितलं त्याच्या आगामी चित्रपटाचं ‘वास्तव’?
Just Now!
X