News Flash

लग्नासाठी प्राची देसाईने ठेवली अट, म्हणाली…

जाणून घ्या ती काय म्हणाली...

छोट्या पडद्यावरुन अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई. १७ वर्षांची असताना प्राचीने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप. प्राची गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब होती. पण तिने एका वेब सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले. प्राचीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या खासगी तसेच प्रोफेशनल लाइफबद्दल सांगितले आहे.

मुलाखतीमध्ये प्राचीला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, ‘माझ्या कुटुंबीयांनी मला ज्या प्रकारे लहानाचे मोठे केले ते पाहून लग्न करणे मला सुरक्षित वाटत नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात खूप वाईट काळ सुरु असेल किंवा माझ्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी असतील तेव्हा मी लग्न करु शकते. मी एकदम साध्या कुटुंबातून आले आहे आणि इथपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी खूप कठिण होते’ असे उत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

पुढे ती म्हणाली, ‘मी अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. माझ्या कुटुंबीयांनी कधीही माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला नाही. त्यांनी मला कधी लग्नाविषयी विचारले देखील नाही. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला आवडते. काही वर्षांनंतर मी लग्न करण्याचा विचार करेन. पण एकच अट असेल मला हवा तसा परफेक्ट मुलगा माझ्या आयुष्यात याला हवा.’

प्राची देसाईने रॉकऑन, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, बोल बच्चन, तेरी मेरी कहानी, एक विलन, रॉकऑन 2 आणि कॉर्बन या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच छोट्या पडद्यावरील कसम से, कसौटी जिंदगी के, झलक दिखला जा, सीआयडी आणि नागिन या मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्राचीची ‘सायलेंस’ ही सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये ती अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासोबत दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 2:38 pm

Web Title: prachi desai speaks about marriage avb 95
Next Stories
1 पैलवान अनुष्का! चक्क विराटलाच उचललं….हा व्हिडिओ पहा!
2 ‘चिट्टीया कलाईया’ गर्लचा नवा चित्रपट; लंडनमध्ये चित्रीकरण
3 ‘मिस्टर लेले’चं शूटिंग थांबलं; ‘हे’ आहे कारण!
Just Now!
X