बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मोदी सरकारने Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. सध्या कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दित द्वंद्व सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाला ही सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंगनाच्या फोटोसोबत पायी चालणाऱ्या गरीब मजुरांचे फोटो शेअर करुन याला नवा इंडिया म्हणायचं का? असा प्रश्न केंद्राला विचारला आहे. या फोटोंच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

dd news new logo
“DD चं आता भगवीकरण झालंय”, लोगोचा रंग बदलल्यावरून माजी CEO चा हल्लाबोल; म्हणाले, “प्रसार नव्हे, प्रचार भारती!”
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. दरम्यान कंगना आता मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.