गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कच्चा लिंबू’ या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. १ मिनीट २० सेकंदाच्या या टीझरमध्ये काटदरे कुटुंबियांच्या जगण्याचा अंदाज येतो. सिनेमाचा अधिकतर भाग हा ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये चित्रीत करण्यात आलेला आहे. सिनेमाचा टीझर पाहताना काटदरे पती- पत्नीला करावी लागणारी तडजोड आणि तरीही त्यातही समाधानी असणारं हे कुटुंब नक्कीच अंर्तमुख करायला भाग पाडतं.

बेंबीवर नारळ फेकणाऱ्या दिग्दर्शकावर तापसीने साधला निशाणा, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळेही या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी एका समंजस गृहिणीच्या भूमिकेत दिसते तर सचिन खेडेकर यांनी तिच्या साहेबांची भूमिका साकारली आहे. सोनालीचा म्हणजेच शैला काटदरेचा वाढदिवस तिचा नवरा मोहन अर्थात रवी जाधव विसरला तरी पंडीत साहेब विसरले नाहीत. ते तिच्यासाठी खास केक घेऊन येतात. ती मोठ्या आनंदाने तो केक घरी आणून आपल्या नवऱ्याला दाखवतेही.

पण त्यांचा मतीमंद मुलगा बच्चू मधे येतो आणि तो नक्षीकाम केलेला सुंदर केक अगदी अक्राळपद्धतीने खाऊन टाकतो. टीझर प्रेक्षकांना पूर्णपणे खिळवून ठेवायला मदत करतो. गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या सिनेमाची कथा अजून तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण टीझरमुळे कथा उलगडण्यास मदत होत आहे हे मात्र नक्की. येत्या काही दिवसांमध्ये या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित होईल, त्यातूनही सिनेमाची कथा कळण्यास बरीच मदत होईल.

‘बालक पालक’, ‘टाईम पास’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’सारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी जाधव हे या सिनेमात पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहेत. दिग्दर्शक म्हणून त्याने आतापर्यंत एकाहून एक सरस सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. पण एक अभिनेता म्हणून तो कसा वावरतो याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एक माणूस माझ्या आयुष्यात आला आणि अर्ध्यावर निघून गेला.. बास एवढंच झालं- जेनिफर विंगेट

या सिनेमासाठी अनेकांनी चाकोरी बाहेरचा विचार करण्याचा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर ‘टिपी’ आणि ‘बीपी’ सिनेमाचा दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमातून अभिनयात पदार्पण करत आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.