हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळाला तो हंबीरराव मोहिते यांना. हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्रालाच माहित आहे. त्यांची ही शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडली जाणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे. विशेष म्हणजे भर पावसामध्ये चित्रीकरण करण्याचं आव्हान या संपूर्ण टीमने पेललं आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून नुकतंच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पार पडलं आहे. या चित्रपटाचं जवळपास सगळं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र, ऐनवेळी देशात लॉकडाउनची घोषणा झाली आणि चित्रपटाचं तीन दिवसांचं राहिलेलं चित्रीकरण अपूर्ण राहिलं. त्यानंतर जवळपास ७ महिन्यांनंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, परवानगी मिळाल्यानंतरही या चित्रीकरणात अनेक अडथळे आले. यातलचा एक अडथळा म्हणजे सलग काही दिवस कोसळत असलेला धो-धो पाऊस.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर भोर येथे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भव्य सेट उभारण्यात आला. चित्रीकरणाची सगळी तयारी झाली आणि पाऊस कोसळू लागला. मात्र, चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक व्यक्तीने योग्य नियोजन करत भर पावसात या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.

“६जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो”, असं प्रविण तरडे म्हणाले.

दरम्यान,सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.