News Flash

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ‘देसी गर्ल’ प्रियांका म्हणाली….

भारतात करोना संकट पाहून भावूक 'देसी गर्ल' प्रियांका

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात भयानक परिस्थिती उद्भवलीय. भारतातला हा करोनाचा कहर पाहून बॉलिवूड अभिनेत्री ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा भावूक झाली. आपल्या टि्वटर हॅंडलवरून ट्विट करत तिने हे दुःख व्यक्त केलं. इतकंच नाही तर देशात ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी देखील पुढाकार घेतलाय.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनस याच्यासोबत युएसमध्ये राहतेय. तरीही तिचं भारतावरचं प्रेम अजुनही संपलेलं नाही. तिचा पती निकला देखील भारताबाबतची आपुलकी असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. ज्या ज्या वेळी भारतात चिंताजनक परिस्थिती उद्भवली त्या त्या वेळी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मदतीसाठी पुढाकार घेताना दिसून आली. सध्या भारत देश करोनाच्या महामारीशी झुंज देतोय, अशात ठिकठिकाणी ऑक्सिजन आणि लसींच्या कमतरतेमुळे भारत हतबल होताना दिसून येतोय. हे सर्व चित्र पाहून ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिने थेट अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनाच टॅग करत ट्विट केलंय. यात तिने आभार मानत भारत देशाला करोनावरील लस कधी पाठवणार आहात ? असा सवाल देखील केलाय.

या ट्विटमध्ये लिहीताना ती म्हणाली, ” मला खूप दुःख होतंय…भारतात करोनामुळे हाहाकार माजलाय, भारत करोनाशी झुंज देतोय…अमेरिकेने गरजेपेक्षा जास्त 550 मिलियन इतक्या कोरनावरील लसी मागवल्या आहेत… संपुर्ण जगात या लसी उपलब्ध करून दिल्याबद्दल अॅस्ट्रोजेनेका यांचे खूप खूप आभार…परंतू माझ्या देशाची परिस्थिती खूपच नाजुक आहे…तर तुम्ही या लसी माझ्या देशात लवकरात लवकर पाठवू शकता का ?”. हे ट्विट करताना ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांच्यासोबतच व्हाइट हाउसचे चीफ, बाइडन यांचे सेक्रेटरी आणि व्हाइट हाऊस नॅशनल सिक्यूरिटी एडवाइझर यांना देखील टॅग केलंय.

Insta: @priyankachopra

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ सध्या भारतात राहत नसली तरी भारतात करोना काळात सुरू असलेल्या सर्व परिस्थितीचा ती आढावा घेतेय. यासाठी ती सोशल मिडीयावर बरीच सक्रिय राहतेय. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून कोव्हिडबाबतची सकारात्मक बातमी, त्याबद्दलच्या मदतीसंबंधीच्या पोस्ट सध्या ती शेअर करताना दिसून येतेय. काही दिवसांपासून ती करोनावरील औषधं आणि ऑक्सिजन सिलेंडरबाबत माहिती देणाऱ्या पोस्ट शेअर करतेय. याशिवाय बेड आणि करोना लसींबाबत माहिती देणाऱ्या पोस्ट देखील शेअर करून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतेय. सध्या ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा तिच्या आगामी फिल्म ‘सिटाडेल’ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 1:29 pm

Web Title: priyanka chopra heart breaks to see indias covid situation says my country is critical prp 93
Next Stories
1 ‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स
2 “नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाउनचा नियम नाही का?”, केदार शिंदेचा सवाल
3 ‘मला धक्काच बसला..’, बिग बॉसच्या घरात राहुलने लग्नासाठी विचारताच अशी होती दिशाची प्रतिक्रिया
Just Now!
X