बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ‘ग्लोबल गर्ल’ म्हणून सर्वपरिचित झाली आहे. प्रियांकाने अभिनयापासून सुरु केलेला प्रवास दिग्दर्शनापर्यंत यशस्वीपणे पार पाडला आहे. आता प्रियांका परत एक नवी सुरुवात करत असून ती आता टेक्नॉलॉजी क्षेत्राकडे वळली आहे.

प्रियांकाने नुकतीच दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यातील एका कंपनीचा लवकरच भारतातदेखील विस्तार होणार आहे. प्रियांकाने गुंतवणूक केलेल्या या दोन्ही कंपनी टेक स्टार्सअप आहेत. यातील पहिली कंपनी सॅन फ्रांसिस्कोची ‘होल्बर्टन’ ही कंपनी असून ती कोडिंग एज्युकेशन कंपनी आहे. तर दुसरी कंपनी डेटींग अॅपची असून तिचं नाव ‘बंबल’ असं आहे.

प्रियांकाने गुंतवणूक केलेली ‘बंबल’ या कंपनीचा विस्तार भारतातही होणार आहे. ‘बंबल’ हे डेटींग अॅप महिलांच्या सुरक्षेसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.
महिलांसाठी गुंतवणूक, सोशल ट्रान्सफॉर्मेशन आणि आणि त्यांची आर्थिक वृद्धी गरजेची आहे. महिलांना केवळ चूल आणि मुल एवढंच आयुष्य नाही. तिलादेखील तिचं करिअर आहे. यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार असून या अॅपच्या मदतीने महिलांची सुरक्षेसाठीही महत्वाचं ठरणार आहे, असं प्रियांका म्हणाली.