प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन या दोन्ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून दोघांनी एकत्र काम केलंय. तसं आघाडीच्या दोन अभिनेत्रींनी आमच्यात सारं काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांच्यामध्ये असलेली ‘कॅट फाईट’ लपून राहत नाही हे पुन्हा एकदा समोर आलंय. नुकताच प्रियांकाचा साखरपुडा पार पडला. मात्र यावेळी देसी गर्ल प्रियांकानं दीपिकाला आमंत्रण देणं आवर्जून टाळलं. विशेष म्हणजे प्रियांकानं दीपिकाचा होणारा नवरा रणवीर सिंग याला मात्र पार्टीचं न विसरता आमंत्रण दिलं.

निकच्या वाढदिवशी रोका पार पडला. त्यानंतर संध्याकाळी प्रियांकानं साखरपुड्याची पार्टी ठेवली होती. या पार्टीत प्रियांकानं बॉलिवूड आणि तिच्या जवळच्या निवडक २० लोकांना आमंत्रण दिलं होतं. यात अर्पिता, आलिया भट्ट, रणवीर सिंगचाही समावेश होता. मात्र तिनं या यादीतून दीपिकाला वगळल्याचं डीएनएनं म्हटलं आहे. दीपिका आणि प्रियांकानं ‘बाजीराव मस्तानी’मध्ये एकत्र काम केलं. या दोघींमध्ये चांगली मैत्री देखील आहे. मात्र प्रियांकानं यावेळी रणवीरला बोलावलं पण दीपिका मात्र आवर्जून टाळलं त्यामुळे बॉलिवूडमध्ये याच्या चर्चा आहेत. रणवीर आणि प्रियांकानं ‘दिल धडकने दो’, ‘गुंडे’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटातून काम केलं आहे. प्रियांकानं आमंत्रण दिलं असलं तरी रणवीर मात्र प्रियांकाच्या पार्टीत गैरहजर होता.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Prime Minister Narendra Modi
उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख