News Flash

होय, मी ‘त्याच्या’ कानशिलात लगावली होती- प्रियांका चोप्रा

रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रियांकाला एकदा रणरागिणी रुप धारण करावे लागले होते.

एका चाहत्याने गैरवर्तन केल्याने त्याच्या कानशिलात लगावल्याचा खुलासा प्रियांकाने 'जय गंगाजल' चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केला.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचा रणरागिणी अवतार तिच्या ‘जय गंगाजल’ या आगामी चित्रपटात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पण, रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रियांकाला एकदा रणरागिणी रुप धारण करावे लागले होते. एका चाहत्याने गैरवर्तन केल्याने त्याच्या कानशिलात लगावल्याचा खुलासा प्रियांकाने ‘जय गंगाजल’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केला.

गुन्हेगारांना वठणीवर आणणारी रणरागिणी प्रियांका, ‘जय गंगाजल’चा ट्रेलर प्रदर्शित

अंजाना-अंजानी’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सेटवर एका व्यक्तीने जबरदस्तीने माझा हात पकडून आपल्यासोबत फोटो काढण्याची गळ घातली. त्याने माझा अचानक हात पकडल्याने मी घाबरले होते. मग मी पटकन त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या कानशिलात एक जोरदार लगावली होती, असे प्रियांकाने सांगितले. चाहत्यांसोबत फोटो काढायला, त्यांच्याशी गप्पा मारायला माझी काहीच हरकत नसते. उलट चाहते नाराज होणार नाहीत अशीच माझी वागणूक असते. पण एका चाहत्याने..म्हणजे त्याने केलेल्या कृत्यामुळे तो नक्की माझा चाहता होता का? असा प्रश्न पडू शकेल. त्याने माझा जबरदस्ती हात पकडला आणि फोटो काढण्याचा तगादा लावला. हात इतका अमानुषपणे पकडला होता की मला वेदना होऊ लागल्या. मी कशाचाही विचार न करता त्याच्या कानशिलात लगावली आणि तेथून पळ काढला, असे प्रियांकाने सविस्तरपणे पुढे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2015 1:45 pm

Web Title: priyanka chopra recalls slapping fan over misbehaviour
टॅग : Priyanka Chopra
Next Stories
1 ‘सोनी गिल्ड अवॉर्ड’ सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’ला सर्वाधिक पुरस्कार
2 ‘व्यक्ती आणि वल्ली’ पडद्यावर आणणार
3 ‘ती काय मला ‘पप्पा’ म्हणणार?’
Just Now!
X