बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस आहे. आज प्रियांका ३९ वा वाढदिवस साजरा करते. प्रियांका सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रियांकाने एका मुलाखतीत तिच्या सर्जरी विषयी खुलासा केला आहे.

एशियन स्टाइल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाला प्लास्टिक सर्जरी विषयी विचारण्यात आले होते. ही मुलाखत प्रियांकाच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या आधी होती. या सगळ्या गोष्टी प्रियांकाने तिच्या पुस्तकात देखील सांगितल्या आहेत. “मला कोणालाही उत्तर द्यावे लागेल असे मी माझ्या पुस्तकात काही लिहिलेले नाही. मी माझ्या जीवनातील अनेक गोष्टींचा या पुस्तकात उल्लेख केला आहे.”

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
priyanka chopra nick jonas attended mannara chopra birthday
Video: प्रियांका चोप्रा पती निक जोनससह पोहोचली बहिणीच्या वाढदिवसाला, ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

‘The Independent’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाने तिच्या पुस्तकात तिच्या प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख केला आहे. प्रियांकाने या घटनेचा उल्लेख करताना म्हटले आहे की, “२००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर एका दिग्दर्शकाची तिने भेट घेतली होती. त्या दिग्दर्शकाने/ निर्मात्याने मला वॉक करायला सांगितले. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ्या शरीररचनेत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं.”

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील तुमच्या लाडक्या कलाकारांना ओळखलं का?

पुढे ती म्हणाली, “छाती, नितंब आणि हनुवटीवर काही शस्त्रक्रिया करावी लागेल असं त्यांनी मला सांगितलं. मला अभिनेत्री व्हायचे असेल तर मला हे सर्व करावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. ते लॉस एंजेलिसमधल्या एका डॉक्टरला ओळखत होते, ज्याच्याकडे जाण्याचा त्यांनी मला सल्ला दिला होता. त्यावेळी माझे जे मॅनेजर होते त्यांनी या दिग्दर्शकाच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. त्या दिग्दर्शकासोबत करार करुन त्यांनी मला पाठवला होता.” या संपूर्ण घटनेमुळे प्रियांका दु:खी झाली आणि तिने तिच्या मॅनेजर पासून लांब राहण्याचे ठरवले.