बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची मालकी असलेल्या जागेत सेक्स रॅकेट सुरु असल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
मिड डे या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शास्त्री नगरस्थित वास्तू प्रेसिक्ट नावाच्या कमर्शिअल बिल्डिंगमधील एक संपूर्ण मजला प्रियांका चोप्राच्या मालकीचा आहे. प्रियांकाच्या मालकीच्या असलेल्या जागेत एक स्पा सेंटरमध्ये सुरु होते. या जागेत सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड घातली. त्यावेळी त्यांना अनेक तरुण-तरुणी आपत्तीजनक परिस्थितीत आढळून आले. हे स्पा सेंटर चालवणा-या माणिक सोनी नावाच्या इसमाने प्रियांकाकडून ही जागा भाडय़ाने घेतली होती. स्पा सेंटरचा मॅनेजर दिनेश चंद्रकांतला पोलिसांनी अटक केली आहे. या स्पा सेंटरच्या उद्घाटनाला प्रियांकाची आई मधू आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांनी हजेरी लावली होती. पण, या घटनेमुळे धक्का पोहचलेल्या प्रियांकाने आपण स्पाच्या मालकावर विश्वास ठेवून त्याला ही जागा दिल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2014 2:17 am