‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलिवूड अभिनेत्री राहिली नसून ग्लोबल स्टार म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली आहे.‘क्वांटिको’ मालिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली. त्यामुळे तिला आपल्या प्रोजक्टमध्ये घेण्यासाठी सारेच दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असतात. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांकाचं मानधनदेखील आता चांगलंच वधारलं आहे. विशेष म्हणजे केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीदेखील ती तितकंच तगडं मानधन घेत असल्याचं समोर आलं आहे.
इन्स्टाग्रामकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एका पोस्टसाठी कोणते सेलिब्रिटी नेमकं किती मानधन घेतात हे जाहीर करण्यात आलं आहे. यात टॉप १०० लोकांमध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
या यादीमध्ये प्रियांका २८ व्या स्थानावर असून ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल २.१६ कोटी रुपये मानधन घेते. इन्स्टावर तिचे ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
वाचा : ‘हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे’; तांडव प्रकरणावर मुकेश खन्नांची आगपाखड
दरम्यान, सध्या प्रियांका तिच्या आगामी ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2021 1:52 pm