‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आता करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून करणने त्याच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तख्त’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाच्या स्टारकास्टचाही उलगडा त्याने केला आहे.

रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, अनिल कपूर, करिना कपूर, भूमी पेडणेकर या कलाकार मंडळींची फौजच करणने त्याच्या चित्रपटासाठी एकत्र आणली आहे. ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरच्याही नावाचा समावेश आहे. सोशल मीडियावर करणचा हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळे चर्चेत आला. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, आता लवकरच त्याच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. एकिकडे करणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असतानाच पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्वरुन त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1027368104706207744

सोशल मीडियावरुन करण्यात आलेल्या या टीकेमध्ये तैमुरच्या नावाचाही समावेश झाला आहे. ज्या क्षणाला करणने त्याच्या चित्रपटाविषयीची माहिती पोस्ट केली त्याचवेळी अनेकांनी त्याला एक प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न म्हणजे या स्टारकास्टमध्ये तैमूरचं नाव का नाही आहे? नेटकऱ्यांच्या या उपरोधिक प्रश्नाला करण नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/Shekharchaudhry/status/1027538043882749957

https://twitter.com/shivAwake/status/1027538048471334912

वाचा : मध्यंतरातील संवाद

‘तख्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा करणने घराणेशाहीच्याच वाटेवर जात कलाकारांची निवड केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात येत आहे. त्याशिवाय विकी कौशल आणि भूमी पेडणेकर या दोघांनाही चित्रपटात तुलनेने कमी महत्त्वच्या भूमिकांसाठी निवडलं असणार असा तर्कही अनेकांनी लावला आहे. त्यामुळे हा ‘तख्त’ पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरतोय असं म्हणायला हरकत नाही.