04 March 2021

News Flash

अनुष्कानंतर आता राधिका आपटे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

नेटफ्लिक्स म्हणजे राधिका आपटेच आहे असे समीकरण मानून सोशल मीडियावर राधिका आपटेची खिल्ली उडवली जाते आहे.

अनुष्का शर्माच्या सुई धागा सिनेमातील फोटोवरून नेटकऱ्यांनी तिची कशी खिल्ली उडवली हे आपल्याला ठाऊक आहेच. अशात आता नेटकऱ्यांनी अभिनेत्री राधिका आपटेची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. राधिका आपटेचे खूप सारे मेमे तयार करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स आणि घौल या तीन सीरिजमध्ये राधिका आपटेची भूमिका आहे. लस्ट स्टोरीजमध्ये कालंदी, सेक्रेड गेम्समध्ये अंजली माथुर आणि घौलमध्ये निदा रहिम अशी पात्रे साकारली आहेत.

नेटफ्लिक्सच्या तीन वेब सीरिजमध्ये राधिका आपटे आहेच. त्यामुळे नेटफ्लिक्स म्हणजे राधिका आपटेच आहे असे समीकरण मानून सोशल मीडियावर राधिका आपटेची खिल्ली उडवली जाते आहे. संजू सिनेमाच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूरच्या राधिका आपटेला दाखवण्यात आले आहे. तर काही जणांनी कार्बन कार्बन असे म्हणत राधिका आपटेचेच सगळे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनुष्का शर्मानंतर आता राधिका आपटेला ट्रोल केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 7:19 pm

Web Title: radhika apte trolled for her omnipresence on netflix
Next Stories
1 Top 10 News : मिलिंदच्या ‘त्या’ वक्तव्यापासून सलमानच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
2 संजयने सांगितलं त्याच्या आगामी चित्रपटाचं ‘वास्तव’?
3 ‘त्या’ केवळ अफवाच, हृतिकची माध्यमांवर आगपाखड तर दिशानं केली पाठराखण
Just Now!
X