टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडप्यांच्या यादीत आता बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री दिशा परमार सामील झाले आहेत. १६ जुलैला राहुल आणि दिशा लग्न बंधनात अडकले. राहुल आणि दिशाच्या प्री-वेडिंगपासून लग्नविधी आणि रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळतेय.

राहुल आणि दिशाच्या लग्नाच्या अनेक व्हिडीओनंतर आता या जोडप्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राहुल वैद्यची आई या नव दाम्पत्याचं ओवाळून स्वागत केलं आहे. या व्हिडीओत राहुलची राहुल आणि दिशाला ओवाताना दिसत आहेत. त्यानंतर गृहप्रवेशाच्या विधी पार पडल्याचं दिसून येतय. आई ओवाळत असताना राहुल मस्ती करताना दिसत आहे. त्यानंतर दिशा घरात प्रवेश करते. यावेळी जमिनीवर गुलाबाच्या पाकळ्याची सजावट करण्यात आल्याच दिसून येत आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by #LadkiWale (@dishaparmarfans)

हे देखाल वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेने सोडलं मौन म्हणाली; “मला शिल्पा शेट्टीची…”

गृहप्रवेशावेळी दिशा आणि राहुलने अगदी साधा लूक केल्याचं पाहायला मिळतंय. दिशाने लाल रंगाचा पंजाबी सूट परिधान केलाय. गळ्यात साधं मंगळसूत्र, हातात लाल रंगाचा चुडा आणि सिंपल हेअर स्टाइल तिने केलीय. तर राहूलदेखील अगदी साध्या लूकमध्ये दिसतोय. राहुल दिशाच्या गृहप्रवेशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावरून दोघांनाही त्यांचे चाहते नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर राहुल आणि दिशाच्या लग्नासोबतच त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या प्रत्येक सोहळ्यासाठी दिशा आणि राहुलने खास लूक केल्याचं या व्हिडीओंमध्ये आपण पाहू शकतो.