News Flash

“शिल्पा शेट्टीला होती राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची माहिती, तिचीही चौकशी करा”

या सर्व प्रकरणाशी शिल्पा शेट्टीचा काही संबंध आहे का याचा तपास अद्याप सुरु असतानाच आता मॉडेलने खळबळजनक दावा केला असून तिने शिल्पा शेट्टीच्या चौकशीची मागणी

एका मुलाखतीदरम्यान तिने हा धक्कादायक आरोप केला (फोटो इन्स्ताग्राम आणि ट्विटरवरुन साभार)

पॉर्न चित्रपट निर्मितीच्या आरोपाखाली उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अटकेनंतर अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या राज कुंद्रांच्या या उद्योगामध्ये पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग होता का यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या सुरु असणाऱ्या तपासामध्ये राज कुंद्राच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. राज कुंद्रा यांना सध्या मुंबईतील भायखळा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र या सर्व प्रकरणाशी शिल्पाचा काही संबंध आहे का याचा तपास अद्याप सुरु आहे. असं असतानाच आता मॉडेल सागरिका शोना सुमनने या प्रकरणाची शिल्पाला संपूर्ण कल्पना असल्याचे धक्कादायक आरोप केलेत.

मॉडल सागरिका शोना ही तीच मॉडेल आहे जिचं नाव यापूर्वी राज कुंद्रांच्या या प्रकरणाशी जोडलं गेलं होतं. या मॉडेलचा या अश्लील चितत्रपटांच्या उद्योगाशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे. अशाच तिने आता राज यांच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला यासंदर्भात सर्व माहिती होती असं म्हटलं आहे. एबीपी न्यूजशी बोलताना सागरिकाने हा दावा केलाय. शिल्पा ही राज कुंद्रांच्या कंपनीमध्ये डायरेक्ट असल्याचंही सागरिकाने म्हटलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

ती कंपनीची डायरेक्टर आहे तर…

सागरिकाने केलेल्या दाव्यांनुसार कंपनीच्या डायरेक्टर्स आणि भागीदारांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावाचा समावेश आहे. “आपल्या कंपनीमध्ये काय सुरु आहे हे एका डायरेक्टरला ठाऊक नाही असं कसं होऊ शकतं?”, असा प्रश्न उपस्थित करत सागरिकाने यामध्ये शिल्पाचाही सहभाग असल्याचा दावा केलाय. पोलिसांनी शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली पाहिजे. तिला राजच्या पॉर्न रॅकेटसंदर्भात नक्कीच माहिती असणार, असंही सागरिका म्हणालीय.

नक्की वाचा >> पॉर्न सिनेमा प्रकरण : कुंद्रांच्या अटकेनंतरचे Google Search पाहून व्हाल थक्क; महाराष्ट्र आघाडीवर

ती व्यक्ती राज कुंद्राच

सागरिकाने यापूर्वी एका व्हिडीओमध्ये राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एका वेब सीरिजसाठी व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवर न्यूड ऑडिशनची आपल्याकडे मागणी करण्यात आली”, असं सागरिकाने म्हटलं होतं. या कॉलवर उमेश नावाच्या व्यक्तीसोबतच राज कुंद्राही होते. या सर्वांनी माझ्याशी अश्लील भाषेमध्ये संवाद साधला. राज कुंद्राने आपला चेहरा मास्कने झाकला होता. मात्र मी त्याचा चेहरा ओळखला, असंही सागरिका या व्हिडीओमध्ये म्हणालीय.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

पोलिसांना मदत करणार

मी आतापर्यंत यासंदर्भात कुठे वाच्यता केली नव्हती. मात्र आता मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवल्यास मी नक्कीच त्यांची मदत करणार आहे, असंही सागरिकाने स्पष्ट केलं. मला आलेला कॉल हा व्हॉट्सअप कॉल होता. नाहीतर मी तो रेकॉर्ड करुन पुरावा म्हणून पोलिसांना दिला असता, असंही सागरिकाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 3:35 pm

Web Title: raj kundra arrest shilpa shetty know everything says sagarika shona suman scsg 91
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’मधून सुमोनला दाखवला बाहेरचा रस्ता? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
2 ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका
3 ‘टायगर ३’ सिनेमासाठी सलमान खान गाळतोय घाम; वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क
Just Now!
X