भारतात असलेली अयोध्या खरी नसून बनावट अयोध्या आहे. तसंच प्रभू रामचंद्र नेपाळी होते असा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी नुकताच केला. या दाव्यामुळे टीव्हीवरच्या रामायणात काम करणारी सीता अर्थात दीपिका चिखलिया या अभिनेत्रीही चकित झाल्या आहेत. दीपिका चिखलिया यांनी ट्विटरवर रामायणातला एक फोटो पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे दीपिका चिखलिया यांनी ट्विटमध्ये?
दीपिका चिखलिया यांनी रामायण मालिकेतला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत प्रभू रामचंद्र (अरुण गोविल), लक्ष्मण (सुनील लहरी) आणि हनुमान (दारासिंग) असे बसलेले दिसत आहेत. त्या फोटवर एक कॅप्शन दे प्रभू आपने कभी बताया नहीं आप नेपाली हो! अशा ओळी लिहिल्या आहेत. तसंच ही गोष्ट ऐकून हनुमानजींनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”

आणखी वाचा- भगवान राम नेपाळीच होते हे सिद्ध करण्यासाठी नेपाळने घेतला ‘हा’ निर्णय

दीपिका चिखलिया यांनी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे दीपिका यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नेपाळच्या पंतप्रधानांनी नुकताच एक दावा केला त्यात ते असं म्हणाले होते की प्रभू रामचंद्र हे नेपाळी होते. यावर आता दीपिका चिखलिया यांनी ट्विट केलं आहे.