News Flash

.. म्हणून राणा डग्गुबतीचा आनंद गगनात मावेना

'बाहुबली'तील भल्लालदेवच्या भूमिकेने राणा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला.

राणा डग्गुबती

बॉलिवूडमध्ये ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला राणा डग्गुबती याचा नुकताच ‘नेने राजू नेने मंत्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. समीक्षकांकडून त्याच्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांनी मात्र त्याला भरभरून प्रेम दिले. ‘नेने राजू नेने मंत्री’ सोबत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत राणाच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणाने राजा जोगेंदर या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं असून याचा आनंद त्याने सोशल मीडियावर व्यक्त केला.

वाचा : ‘शक्तिमान’मधील ‘किलविश’ दिसते; सोशल मीडियावर मंदिराची खिल्ली

राजा जोगेंदर या आपल्या व्यक्तिरेखेची मिमिक्री करणारा व्हिडिओ राणाने शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याला त्याचे काका आणि प्रसिद्ध अभिनेता व्यंकटेश यांनी साथ दिली आहे. व्यंकटेश यांना विक्टरी व्यंकटेश म्हणूनही ओळखले जाते. राणाने बूमरँग व्हिडिओ शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिलेय की, स्वतः व्हिक्टरी व्ही असलेल्या व्यक्तीसोबत जोगेंदरच्या यशाचा (व्हिक्टरीचा) आनंद साजरा करतोय.

वाचा : अजय- काजोलच्या मुलीला अभिनयात नाही तर या गोष्टीत आहे स्वारस्य

राणाने आजवर केलेल्या चित्रपटांना चाहत्यांचे जे प्रेम मिळाले त्याबद्दल त्याने नुकतेच आभारही मानलेले. ‘बाहुबली’तील भल्लालदेव या व्यक्तिरेखेने प्रसिद्धीस आलेल्या राणाने लिहिलेलं की, मी आजवर निवड केलेल्या चित्रपटांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लवकरच राणा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 10:51 am

Web Title: rana daggubati celebrates nene raju nene mantri success with venkatesh shared boomrang video
Next Stories
1 सिनेनॉलेज : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट कोणता?
2 अक्षय-आरव किचनचा ताबा घेतात तेव्हा..
3 Dahihandi 2017 : …हा होता बॉलिवूडचा पहिला ‘गोविंदा’
Just Now!
X