News Flash

‘हाथी मेरे साथी’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, एक रोमांचक लढाई

26 मार्चला होणारर प्रदर्शित

‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’  सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा  सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा हिंदी भाषेतील ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.

या सिनेमासाठी राणा दग्गुबतीने याने खूप मेहनत घेतलीय. ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमाची पटकथा ही एका माणसाच्या आयुष्यावर आहे. ज्याने आयुष्यातील बराच काळ जंगलात घालवला आणि त्याचे आयुष्य पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी समर्पित केलं आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातील मैत्रीची ही गोष्ट आहे. तसंच या सिनेमाच्या माध्यमातून जंगल आणि हत्तींचं संरक्षण करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

हिंदी भाषेतील सिनेमाच्या व्हर्जननध्ये पुलकित सम्राट, श्रिया पिरळगावकर आणि जोया हुसेन मुख्य भूमिकेत झळकतील. तेलगू आणि तमिळमध्ये देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार असून  ‘आरण्य आणि कदान’ असं त्यांचं नाव असणार आहे.

26 मार्चला सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहेत. तीन भाषेत हा सिनेमा रिलीज होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे. खरं तर राणासाठी एकच सिनेमा अनेक भाषेत करण्याचा ट्रेंड नवा नाही. याआधी ‘बाहुबली’ आणि ‘गाजी अटॅक’ हे त्याचे सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 7:20 pm

Web Title: rana dagubattis hati mere sathi trailer release kpw 89
Next Stories
1 ‘एक और नरेन’, ‘महाभारत’मधील हा कलाकार साकारणार भूमिका
2 ‘सायना’च्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर
3 ‘अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरून झाला होता विरोध’, मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा
Just Now!
X