बॉलिवूड विश्वात सध्या ‘ब्रेक अप’च्या चर्चांना उधाण आल आहे. त्यात ‘कतरिना कैफ’ आणि ‘रणबीर कपूर’ ही जोडी काही नवी नाही. काही दिवसांपुर्वीच कतरिना-रणबीरच्या ब्रेक अपच्या चर्चा माध्यामांमधून रंगल्या होत्या. आता त्यात नवीन भर पडलेली दिसते. कतरिनाने रणबीर बरोबर पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली परंतू, रणबीरने त्यास नकार दर्शवला.
एका पार्टीत रणबीर-कतरिना एकत्र आले होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तिने असे सांगितले की कतरिनाने रणबीरला पुन्हा एकत्र येण्याबद्दल विचारले असता रणबीरने त्यास नकार दर्शवला. त्यानंतर कतरिना खूपच नाराज दिसली. या बातमी मुळे पुन्हा एकदा बॉलिवूड विश्वात कतरिना-रणबीरच्या ब्रेक अप-पॅच अपच्या चर्चांना उधाण आले आहे.
रणबीर-कतरिना ही जोडी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनीति’ या चित्रपटातून एकत्र दिसली होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
कतरिनाकडून पॅच अपचा प्रस्ताव रणवीरने फेटाळला
कतरिनाने रणबीर बरोबर पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-04-2016 at 13:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor reject katrina kaif patch up proposal