News Flash

कतरिनाविषयी केलेल्या ‘या’ वक्तव्यानंतर रणवीरने मागितली रणबीरची माफी

रणवीरची लग्नासाठी दिपिकालाच पसंती

कतरिना कैफ (संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या लोकप्रिय शोच्या दरम्यान बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एका मंचावर दिसले. या कार्यक्रमामध्ये रणवीरने कतरिनासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्याला रणबीरची माफी मागावी लागली. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण हा चॅट शो सुरु झाला. या शोमध्ये रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र दिसले.  या कार्यक्रमात करणने दोन डॅशिंग कलाकारांवर काही मजेदार सवालांची बरसात केली. करणने रणवीरला काही प्रश्न विचारले. यामध्ये कोणत्या अभिनेत्रीसोबत संसार थाटायला आवडेल?, कोणत्या अभिनेत्रीला तुला मारावस वाटते? आणि कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला रिलेशनशिपमध्ये राहायला आवडेल? असे तीन प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी रणवीरने त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे दीपिकासोबत लग्न करायला आवडेल असे सांगितले. अनुष्काला मारायला आवडेल असे सांगत त्याने कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यास आवडेल असे उत्तर दिले. कतरिनाचे नाव घेतल्यानंतर रणवीरने लगेच रणबीरची माफी देखील मागितली.

रणवीरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसह वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे चित्रीकरण ५० दिवसांत पॅरिस आणि मुंबई येथे करण्यात आले आहे. ‘बेफिक्रे’ चित्रपटाची कथा पॅरिसमध्ये राहणारा मुलगा धरम (रणवीर) आणि शायरा (वाणी) यांच्याभोवती फिरते. हे दोघेही अनौपचारिक प्रेमसंबंधांमध्ये असतात. यात ते आपण कधीच एकमेकांच्या प्रेमात पडणार असा करार करतात. त्यानंतर नक्की काय होते ते तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. अभिनेता रणबीर कपूर अनुष्कासोबत ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसला होता. यानंतर रणबीर कपूर आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात दिसणार आहे. यात कतरिना कैफ आणि अदा शर्मा यांच्याही भूमिका आहेत. रणबीर आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेला ‘जग्गा जासूस’ ७ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होईल.  बॉलीवूडमधल्या कलावंतांच्या गाजणाऱ्या जोडय़ा आणि त्यांची लिव्ह इन रिलेशनशिप हा बी-टाऊनच्या गॉसिप कट्टय़ावर सदाहरित विषय आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा ही रणबीर कपूर-कतरिना कैफ या जोडीची रंगली होती. दोघे  लग्न करणार असल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या. आजही रणबीर कतरिना म्हटले की त्यांचे प्रेमाचे किस्से चाहत्यांना आठवतात.  रणबीर-कतरिना ही जोडी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनीति’ या चित्रपटातून एकत्र दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 10:32 pm

Web Title: ranveer singh apologies to ranbir singh because of katrina kaif
Next Stories
1 ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय-अजय यांच्यात रंगणार ‘सामना’
2 ‘पद्मावती’सोबत व्यग्र असणाऱ्या शाहिदचे पत्नीसोबतचे गोड क्षण
3 शिवाजी नाट्यमंदिरात ‘रेडिओवाणी’ची अविस्मरणीय मैफिल!
Just Now!
X