बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. येत्या दोन वर्षात तो सात नवे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटांपैकी एका चित्रपटात रणवीर सिंग अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी त्या दोघांनी ‘गली बॉय’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रणवीर आणि आलिया एकत्र काम करणार असलेल्या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. तसेच रणवीर त्याच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण संपवून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. या चित्रपटासाठी तो २५ दिवसांच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
एप्रिल २०२१मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. दरम्यान आलिया भट्ट देखील संजयलीला भंसाली यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. अद्याप रणवीर आणि आलियाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 7:40 pm