News Flash

रणविजय सिंह दिसणार ‘या’ वेब सीरिजमध्ये

रणविजय दिसणार पोलिसाच्या भूमिकेत...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सुत्रसंचालक म्हणून रणविजय सिंग ओळखला जातो. रणविजयचे लाखो चाहते आहेत. रणविजयला आपण नेहमीच सुत्रसंचालन करताना पाहिले आहे. मात्र, आता रणविजय पुन्हा एकदा एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘गर्लफ्रेंड’ असे या नवीन वेब सीरिजचे नाव आहे.

या सीरिजमध्ये रणविजय सुमेर सिंग नाव असलेल्या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सुमेरसिंग केस फाईल्स: गर्लफ्रेंड’ची कहाणी एका प्रामाणिक आणि मेहनती पोलिस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते, एसीपी सुमेरसिंग जो दिल्लीला स्थलांतर करतो याच्या अवतीभोवती ही कहानी फिरते. “सुमेर सिंगची भूमिका साकारण्यात मला खूप आनंद झाला. गेल्या काही वर्षांमध्ये मी रियालिटी शोचे बरेच चढ उतार पाहिले आहेत. तसेच या सीरिज मध्ये मला एका पोलिसाची भूमिका साकारायला मिळणार आहे. वेगळी भूमिका साकारण्यासाठी मला एक संधी मिळाली आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी, मी एका पोलिसांच्या जीवनात स्वतःला झोकून दिले व त्याच्या शरीराची भाषा, विविध तंत्र शिकण्यापासून तसेच वापरत असलेल्या चौकशीच्या पद्धती समजून घेण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. ही संपूर्ण प्रक्रिया खूप फायद्याची ठरली” असे रणविजय त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला.

पुढे सीरिज बद्दल बोलताना रणविजय म्हणाला, “पहिल्या भागाला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप भारावून गेलो होतो. प्रेक्षकांना आमचा नवीन सीझन कसा वाटतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. वूट सिलेक्ट सोबत काम करताना खूपच मजा आली, मी आशा करतो की प्रेक्षकांना नवीन सीजन पाहायला खुप आवडेल.”

‘सुमेर सिंग केस फाइल्स-गर्लफ्रेंडस’ ही नवीन सीरिज आपल्याला वूट सिलेक्टवर पाहायला मिळेल. या सीरिजमध्ये रणविजय सिंहसोबत करिश्मा शर्मा, प्रियांका पुरोहित, अदिती आर्य आणि अलीशा मेयर या ‘गर्लफ्रेंड्स’ म्हणून त्याला साथ देतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 6:46 pm

Web Title: ranvijay singh will be next seen in this web series dcp 98
Next Stories
1 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सलमान आणि कंगनाला फटका
2 बॉलिवूडवर करोनाचं सावट, भूमी पेडणेकरला करोनाची लागण
3 अक्षय-गोविंदानंतर विकी कौशलला करोनाची लागण
Just Now!
X