News Flash

प्रसिद्ध रॅपर रफ्तार करोना पॉझिटिव्ह

व्हिडीओ शेअर करत रफ्तारने दिली माहिती

सध्या सर्वत्र करोनाने थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्रसिद्ध रॅपर रफ्तार याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या रॅपर रफ्तार घरीच क्वारंटाइन झाला आहे.इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर करत त्याने ही माहिती दिली.

“तुम्हाला काही सांगायचं आहे. मी रोडिजमध्ये सहभागी होणार होतो.मात्र माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या पहिल्या दोन टेस्ट निगेटीव्ह आल्या होत्या. मात्र तिसरी पॉझिटिव्ह आली.त्यामुळे बीएमसीने मला सेल्फ आयसोलेशन करण्यास सांगितलं आहे. सध्या मी घरीच क्वारंटाइन झालो आहे”, असं रॅपर रफ्तारने त्याच्या व्हिडीओत सांगितलं आहे.

पुढे तो म्हणतो, “मी खरंतर पुढच्या चाचणीची वाट पाहतोय. मला सतत असं वाटतंय चाचणीत काही तरी चुकलं आहे. कारण मी एकदम व्यवस्थित आहे. माझ्यात कोणतीच लक्षण नाही. परंतु, मी स्वत:ला आयसोलेट करणं हे सध्याच्या घडीला माझं कर्तव्य आहे. मी फिट आहे आणि यापुढेदेखील माझे हेल्थ अपडेट मी देत राहिन”.

दरम्यान, रफ्तार हा लोकप्रिय रॅपर असून तो लवकरच एमटीव्ही रोडिज या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार होता. मात्र त्यापूर्वी केलेल्या करोना टेस्टमध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 1:00 pm

Web Title: rapper raftaar tests positive for covid 19 self isolation at home ssj 93
Next Stories
1 दिग्दर्शक शारदा प्रसन्ना नायक यांचा करोनामुळे मृत्यू
2 ‘नैराश्यात असलेल्या प्रियकराला तुम्ही ड्रग्स देणार का?’; रियाला पाठिंबा देणाऱ्यांना अंकिताचा सवाल
3 ड्रग्सविषयी काय म्हणाली होती रिया?; ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
Just Now!
X