गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित करणाऱ्या या मालिकेतील कथानकाने आता नवीन वळण घेतले आहे. आतापर्यंत अण्णांवर प्रेम करणारी शेवंता आता त्यांच्यापासून दूर जाणार आहे.

शोभावर गोळी झाडल्याप्रकरणी अण्णांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. आजवर कोणालाही त्यांच्यासमोर डोळे वर करुन बोलण्याची हिंमत होत नव्हती, परंतु पोलिसांनी अक्षरश: मान पकडून त्यांना गाडीत कोंबल्यामुळे संपूर्ण गावासमोर अण्णांची नाच्चकी झाली. दरम्यान शेवंता त्यांना तुरुंगात भेटायला येते परंतु तिचे बदललेले रुप पाहून अण्णा आश्चर्यचकित होतात. तुरुंगातून सुटका होताच क्षणी शेवंताच्या प्रेमात आकंठ बुडालेले अण्णा तिच्या घरी जातात. परंतु तेव्हा शेवंता आता माझे तुमच्यावर प्रेम राहिलेले नाही, अशी अप्रत्यक्षरित्या कबूली देते. या कथानकामुळे आता शेवंता आता अण्णांपासून दूर जाणार असे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रिस खेळ चाले – २ ही एक प्रिक्वेल मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात शेवंताच्या खूनाचे कथानक दाखवण्यात आले होते. पोलिसांनी अथक प्रयत्न करुनही तिच्या खुनाचा उलगडा झाला नव्हता. सध्याचे कथानक पाहत शेवंताने अण्णांना फसवले हा राग मनात ठेवून त्यांनीच तिचा खून केला होता का? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु आहे.