गूढ, थरारपूर्ण अशा ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत मोठे वळण आले आहे. काशीच्या मृत्यूनंतर वच्छीला खूप मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील वच्छी या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत संजीवनीने सेटवरचा गमतीशीर किस्सा सांगितला.

मालिकेमध्ये उत्तमपणे खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या वच्छीचा स्वभाव प्रत्यक्षात मात्र या व्यक्तीरेखेच्या विरुद्ध आहे. या मालिकेची शूटिंग बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस होते. त्यावेळी घडलेला एक किस्सा वच्छीने सांगितला.