News Flash

राज कपूर यांच्या ‘किसी के मुस्कुराहटों पे’ गाण्याचा रिमेक!

जुन्या हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांचा ‘रिमेक’ करणे ही नवलाईची बाब राहिलेली नाही

गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासह संजय दत्तचा मुलगा दिसणार आहे. 

जुन्या हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांचा ‘रिमेक’ करणे ही नवलाईची बाब राहिलेली नाही. खासगी आल्बम किंवा चित्रपटासाठी जुन्या गाजलेल्या हिंदी गाण्यांचा ‘रिमेक’ करण्यात येतो. आता राज कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘किसी के मुस्कुराहटों पे’ या गाजलेल्या गाण्याचाही ‘रिमेक’ केला जाणार आहे. या गाण्यात बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांच्यासह संजय दत्तचा मुलगा शाहरान प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

संजय दत्त होम प्रॉडक्शनतर्फे ‘सुख पिघल गया’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटासाठी ‘किसी की मुस्कुराहटों पे’ या गाण्याचे रिमिक्स करण्यात आले आहे. या गाण्याचा रिमेक करण्यासाठी सर्व तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत.

शाहरान हा अवघ्या तीन वर्षांचा असून ‘किसी की मुस्कुराहटों पे’ हे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी दाखविण्यात येणार आहे. गाण्यात सुरुवातीला चित्रपटातील मुख्य कलाकार आरमान दिसणार असून शेवटी दाखविण्यात येणाऱ्या गाण्यात अमिताभ बच्चन दिसणार आहेत. नेजल शाह दिग्दíशत या चित्रपटात संजय दत्तची भाची नाझिया हुसेन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक ओ. पी. रल्हन यांचा नातू आरमान मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:07 am

Web Title: remake of raj kapoor kisi ki muskurahaton pe song
टॅग : Raj Kapoor
Next Stories
1 कपिल शर्माची नवी ‘कॉमेडी स्टाइल’
2 उदयोन्मुख गायकांसाठी ‘संगीत आणि त्यापलीकडे’चे व्यासपीठ
3 ओळखल का या बॅालिवूड अभिनेत्याला
Just Now!
X