News Flash

“मी रुग्णालयात दाखल होताच त्याने..”; रेमोने केलं सलमानचं कौतुक

"सलमान खरंच देवदूत आहे."

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रेमो डिसूझाच्या तब्येतीत सुधारणा होतेय आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रेमोने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानचं कौतुक केलं.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “सलमान खानला आम्ही देवदूत म्हणतो. कारण सगळ्यांची मदत करायला तो नेहमीच पुढे असतो. मी त्याच्याबरोबर काम केले आहे आणि मला माहित आहे की तो किती चांगला आहे. सलमान आणि माझं जास्त बोलणं होत नाही. मी फक्त ओके सर, येस सर एवढंच बोलतो. खरंतर माझी पत्नी लिझेल आणि सलमान सर खूप चांगले मित्र आहेत. मला रुग्णालयात दाखल केल्यानंतर लिझेलने सलमान सरांना फोन केला. मी रुग्णालयात असताना सहा दिवस त्याने माझी विचारपूस केली. त्याने डॉक्टरांशीही वैयक्तिकरित्या विचारपूस केली”

आणखी वाचा : ‘मेरी राख को गंगा मे मत बहाना’; कंगना रणौतची कविता

‘रेस 3’ या चित्रपटात सलमान खान आणि रेमोने एकत्र काम केले आहे. रेमोने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. २०१३ मध्ये त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 5:04 pm

Web Title: remo dsouza said salman khan is an angel dcp 98
Next Stories
1 काय?? फक्त १५ मिनिटांसाठी उर्वशी रौतेलाने घेतलं इतक्या कोटींचं मानधन
2 रुपाली भोसलेचा ‘कार’नामा; फोटो शेअर करत म्हणाली…
3 दिशा पटानीचा बिकिनी फोटो व्हायरल; फक्त दोन तासांत मिळाले इतके लाख लाइक्स
Just Now!
X