21 October 2020

News Flash

“साराने अक्षरश: माझ्यासमोर हात जोडले होते,” रोहित शेट्टीचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

जाणून घ्या कारण..

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवनच्या ‘कुली नं. १’ चित्रपटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर स्टारकिड्सला ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे साराचा एक जुना व्हिडीओ व्हायरल करत चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी स्टार किड्सला इतकी मेहनत का करावी लागते असे उपरोधिकपणे एका यूजरने म्हटले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीने जेव्हा पहिल्यांदा सारा त्याला भेटायला गेली तेव्हा त्यांच्यामध्ये झालेले संभाषणाबद्दल सांगितले आहे.

‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान आणि रोहित शेट्टी द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते. त्यावेळी रोहितने साराला चित्रपटात भूमिका कशी दिली हे सांगितले. सारा एकद दिवस माझ्या ऑफिसमध्ये एकटी आली. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली सर मला काम द्या. सैफ अली खान आणि अमृत सिंहची मुलगी एकटी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि मला काम दे म्हणाली. मला अक्षरश: रडायला आले असे रोहित शेट्टी बोलताना दिसत आहे.

साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तिला ट्रोल केले जात आहे. स्टार किड्सला इतकी मेहनत का घ्यावी लागते असे एका यूजरने म्हटले आहे.

‘कुली नंबर १’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धनव केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 11:44 am

Web Title: rohit shetty talks about casting sara ali khan in simbha movie avb 95
Next Stories
1 अथिया शेट्टीने पोस्ट केला स्वीमसूटमधला फोटो; के. एल. राहुलच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
2 अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा
3 अनुभवातून शिकणे हेच जगणे!
Just Now!
X